जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जिल्हा कार्यध्यक्ष Live ट्रेंड, जळगावचे पत्रकार मा. श्री. प्रविण श्रावण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तसेच संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्तीपत्र संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी प्रदान केले.
प्रविण पाटील हे डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून, जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करणे, डिजिटल माध्यमातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे तसेच संघटनेचा विस्तार करण्यासाठी ते कार्य करतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मा. श्री. प्रविण श्रावण पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे सचिन गोसावी, विक्रम कापडणे, सतिश सैंदाने नगराज पाटील, भूषण महाजन, भगवान मराठे, संतोष नवले, योगेश सैतवाल, गोपाल सोनवणे, संजय चौधरी, अबरार मिर्झा, चंदू खरे आदींनी त्यांना शुभेच्छा देत भावी कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

unlocker.ai – The Ultimate AI Tool for Bypassing Restrictions and Unlocking Content Seamlessly!