filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;
जनता लाईव्हच्या बातमीचा दणका! मुख्य बाजारपेठेतील फटाके दुकानांवर उपमहापौरांसह अधिकाऱ्यांची धडक पाहणी; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश!
जळगाव | जनता लाईव्हजळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत सुरू असलेल्या फटाके विक्रीच्या दुकानांबाबत जनता लाईव्हने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने बातम्या प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातम्यांची दखल घेत अखेर आज महानगरपालिका प्रशासन थेट मैदानात उतरले. उपमहापौर मनोज चौधरी यांनी उपायुक्त पंकज गोसावी, अग्निशमन विभागाचे प्रमुख घरडे साहेब तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकूर यांच्यासह मुख्य बाजारपेठेतील विविध फटाके विक्रीच्या दुकानांना प्रत्यक्ष भेट देत विशेष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान अग्रवाल फटाके, मकरा एजन्सी, राज फटाके, स्टँडर्ड फायरवर्क्स यांसह अन्य फटाके विक्रीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट दिली. संबंधित दुकानांमध्ये फटाके विक्रीसाठी आवश्यक असलेले परवाने, सुरक्षिततेच्या अटी, अग्निशमन यंत्रणा आणि नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दुकानधारकांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.
जनता लाईव्हने उपस्थित केलेले प्रश्न अखेर प्रशासनाच्या दारात!
मुख्य बाजारपेठेतील फटाके विक्रीच्या दुकानांमध्ये सुरक्षिततेचे नियम पाळले जात आहेत का? संबंधित दुकानधारकांकडे आवश्यक परवानग्या आहेत का? दुकानांमध्ये तसेच साठवणुकीच्या ठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी व्यवस्था आहे का? गर्दीच्या बाजारपेठेत फटाक्यांची विक्री करताना नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न जनता लाईव्हने आपल्या बातम्यांच्या माध्यमातून उपस्थित केले होते.
विशेषतः दिवाळीच्या काळात मुख्य बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत फटाक्यांची विक्री आणि साठवणूक करताना नियमांचे पालन न झाल्यास एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा विषय केवळ दुकानांच्या परवान्यांपुरता मर्यादित नसून हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे.
केवळ पाहणी नको, कारवाईचा परिणामही दिसायला हवा!
आज उपमहापौर आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दुकानांवर जाऊन पाहणी केल्यामुळे प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आता या पाहणीचे रूपांतर प्रत्यक्ष कारवाईत होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या दुकानांमध्ये परवान्यांच्या अटींचे उल्लंघन आढळेल, अग्निसुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असतील किंवा नियमबाह्य साठवणूक केली जात असेल, त्यांच्यावर कोणताही दबाव न घेता कारवाई होणे अपेक्षित आहे.
जनता लाईव्हच्या बातम्यांनंतर प्रशासनाने थेट बाजारपेठेत उतरून पाहणी केली, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. लोकशाहीत माध्यमांचे काम केवळ घटना दाखवणे नसून प्रशासनाला जनहिताच्या प्रश्नांची जाणीव करून देणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न करणे हेही आहे.
आता प्रश्न एवढाच… जनता लाईव्हने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम केवळ पाहणीपुरतीच राहणार, की नियमभंग करणाऱ्यांवर खरोखर कठोर कारवाई होणार?
जळगावकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या संपूर्ण कारवाईवर जनता लाईव्हचे लक्ष राहणार आहे.
