जनता लाईव्ह :– “विकासाच्या गप्पांपासून वास्तवाच्या पडझडीपर्यंत…”
एवढं मोठं मंत्रिपद असताना उत्तर महाराष्ट्र तर दूरच, पण जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी गिरीश महाजन यांनी नेमकं काय केलं हा प्रश्न आता अधिक तीव्र होत चालला आहे. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आरोप की “महाजन यांच्याकडे सत्ता असूनही एकही मोठा उद्योग जळगावात आणण्यात अपयश” हा आरोप केवळ राजकीय नाही तर वास्तवाचे प्रतिबिंब असल्याचं चित्र जिल्ह्यात स्पष्टपणे दिसून येत आहे. जळगावला विकासाच्या नावावर केवळ आश्वासने, जाहीराती आणि राजकीय मेळावे मिळाले; पण औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती, स्टार्टअप केंद्रे, आयटी पार्क, आधुनिक कृषी प्रक्रिया उद्योग यापैकी एकाचाही ठसा आजपर्यंत उमटत नाही.
निवडणूकीत विकासाच्या घोषणा, जिल्ह्यासाठी मोठमोठी वचने आणि घोषणा फोडल्या गेल्या, मात्र प्रत्यक्षात जळगावचा प्रवास बदलाऐवजी अधोगतीकडे झाल्यासारखा जाणवत आहे. इथे पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, शिक्षण, औद्योगिक वाढ, शासकीय निर्णयक्षमता यांचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव मागच्या बाकावर बसला आहे.
राजकीय भाषणांतून ‘मी केले, मी आणले’ अशी घोषणात्मक शैली पुरेशी असली तरी विकास हा केवळ शब्दांचा खेळ नसतो, तो योजनांचा, कृतीचा आणि परिणामांचा प्रश्न असतो. जर जळगावच्या युवकांना आज रोजगारासाठी नाशिक, पुणे किंवा मुंबईकडे स्थलांतर करावं लागत असेल, तर मग या सत्तेचा आणि मंत्रिपदाचा जळगावला नेमका लाभ काय? जळगाव जिल्ह्यात प्रत्येक सभेत कोटी कोटी रुपयाची आश्वासने दिली जातात हे मात्र खरं आहे,
मागील काही दिवसापूर्वी माजी मंत्री सुरेश जैन यांनी सुद्धा याबाबत खंत वेगळी केली होती जळगाव शहराला सिंगापूर, पॅरिस बनवायचं होतं पण ते कुठे आता खेड्यापेक्षाही बिकट परिस्थिती जळगाव शहराची बघायला मिळते या शब्दात त्यांनी कोणाचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती
आज जळगावकरांना हवंय उद्योग, संधी, आधुनिकिकरण आणि भविष्य. फक्त छायाचित्रांवर, उद्घाटन फितींवर आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घोषणांवर नाही. त्यामुळे रोहित पवारांच्या प्रश्नाला आता उत्तरापेक्षा पुरावा अपेक्षित आहे — आणि ते उत्तर जळगावच्या जमिनीवर उद्योगाच्या स्वरूपात दिसलं तरच लोकांचा विश्वास पुन्हा जागा होईल.
जोवर हे होत नाही, तोवर हा प्रश्न तसाच धगधगत राहणार “मंत्रिपद मोठं, पण जळगावासाठी काम कुठं?”

Really interesting read! It’s great to see platforms like legend link online casino blending culture with modern gaming – that “Sacred Registration” sounds unique! Responsible gaming is key, and honoring traditions is a plus. 👍