filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.75648147, 0.59468436);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;
दोन दिवसांचा संगीत सोहळा – देशातील नामवंत कलाकारांची स्वरमाधुरी रसिकांना अनुभवायला मिळणार..
जळगाव | अभिजात संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा आणि परंपरेचा मान राखणाऱ्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे यंदा संगीतप्रेमी जळगावकरांसाठी एक आगळावेगळा संगीत उत्सव घेऊन येण्यात आला आहे. देशातील नामांकित कोलकाता येथील ITC संगीत रिसर्च अकादमीच्या सहकार्याने हा भव्य “मिनी संगीत संमेलन” शनिवार आणि रविवार, दि. १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत भैय्यासाहेब गंधे सभागृहात रंगणार आहे. या दोन दिवसीय संगीत सोहळ्याचे उद्घाटन खासदार सौ. स्मिताताई वाघ आणि ITC चे गुरु पं. ओंकार दादरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होणार आहे.
🎶 अभिजात संगीतासाठी प्रतिष्ठानचा २३ वर्षांचा प्रवास गेल्या २३ वर्षांपासून प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘बालगंधर्व संगीत महोत्सवा’ने केवळ जळगाव नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रतिष्ठा मिळवली आहे. अभिजात संगीत संवर्धनासाठी सातत्याने काम करणाऱ्या या संस्थेने देशभरातील अनेक नामांकित संस्थांशी सहकार्य केले आहे. आता ITC संगीत रिसर्च अकादमीसोबतचे हे नव्याने झालेले कोलॅबोरेशन म्हणजे अभिजात रसिकांसाठी एक नवा पर्व ठरणार आहे.
पहिला दिवस – सरोद व शास्त्रीय गायनाची संगती पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात ITC अकादमीचे स्कॉलर कौस्तव रॉय यांच्या सरोद वादनाने होईल. त्यांना रमेंद्र सिंग सोलंकी तबल्यावर साथ करतील.
दुसऱ्या सत्रात अकादमीचे गुरु व प्रख्यात गायक पं. ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन रंगणार असून, त्यांना तेजोवृष जोशी तबल्यावर आणि अनंत जोशी संवादिनीवर साथ देतील.
दुसरा दिवस – कथक, गुरुवंदना आणि स्वरमंथन रविवारी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात जळगावच्या युवा कलाकार नुपुर चांदोरकर-खटावकर व आर्या शेंदुर्णीकर यांच्या कथक नृत्य व गुरुवंदनेने होईल. यानंतर ITC चे स्कॉलर अनुभव खामारू शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना तेजोवृष जोशी तबल्यावर आणि अनंत जोशी संवादिनीवर साथ करतील.
🌸 जळगावकरांसाठी संगीत मेजवानी
या दोन दिवसीय संगीतमहोत्सवात स्वर, लय आणि नाद यांचे अनोखे सहजीवन रसिकांना अनुभवता येणार आहे. अभिजात संगीताच्या चाहत्यांसाठी हा कार्यक्रम एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे.

Домики и гостевые дома посуточно
Домики посуточно подойдут для больших компаний.
– Идеально для больших компаний и семей.
– Находятся за городом или у моря.
– Атмосфера уюта и спокойствия.
Жильё посуточно
@airbn@b77 https://sutochny.ru/poleznyye-sovety/