“मुंबईत येऊ नका, गावोगावी झाडे लावा : राज ठाकरे यांच्या संदेशाला प्रतिसाद”
जनता लाईव्ह :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असताना, नशिराबाद येथेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी सन्माननीय राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला होता. वाढदिवसानिमित्त मुंबईत गर्दी करून शुभेच्छा देण्यासाठी येण्याऐवजी, प्रत्येकाने आपल्या गावात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद देत नशिराबाद येथे मनसेच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला.
आजच्या वाढत्या प्रदूषणाच्या आणि पर्यावरणीय असमतोलाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दिलेला हा संदेश केवळ राजकीय न राहता सामाजिक जाणीव जागवणारा ठरला आहे. फुले, झाडे आणि हिरवाईमुळे गावांचे सौंदर्य वाढावे तसेच पुढील पिढीसाठी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण व्हावे, हा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
या उपक्रमावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक धर्माधिकारी, विवेक दादा नाईक, नशिराबाद मनसे शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, सुभाष काका पवार, दिलीप दादा मिस्तरी, शुभम भावसार, विशाल पाटील, पियुष जोशी, गणेश कुंभार, गोपाल भारुडे, राकेश बिऱ्हाडे, रितेश बराटे, संतोष कुंभार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय कार्यक्रमांपेक्षा सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले गेले, तर त्यातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो. नशिराबादमध्ये झालेल्या या वृक्षारोपण उपक्रमातूनही पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित झाली.

