जनता लाईव्ह :– जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील साने गुरुजी कॉलनी, टेलिफोन नगर, श्रद्धा कॉलनी, समित्र कॉलनी आणि इंद्रप्रस्थ नगर परिसरात आज जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचारातून केवळ उमेदवारांचा परिचय नव्हे, तर संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि मतदारांशी थेट संवाद यांचे प्रभावी दर्शन घडले.
या प्रचार मोहिमेत गायत्री इंद्रजीत राणे (१२-क), नितीन मनोहर बरडे (१२-ड) आणि अनिल सुरेश अडकमोल (१२-अ) हे उमेदवार केंद्रस्थानी होते. त्यांच्या सोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ, तसेच जळगाव मंडळ क्रमांक ३ (सरदार वल्लभभाई पटेल मंडळ – रामानंद नगर व महाबळ परिसर) चे अध्यक्ष अजित राणे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
या प्रचारात फालक काका, वैशालीताई पाटील, अक्षय चौधरी, नीला चौधरी, सुनिल पाटील, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, रोहीत देवरे, अजय चौधरी, सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, तन्मय राणे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलु शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, आशिष सपकाळे, खुशाल महाजन, संकेत कापसे, निरज बरडे, अजिंक्य पाटील, संतोष भंगाळे, ललित पाटील, सुदर्शन चौधरी आणि संतोष पाटील यांसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
घराघरांत जाऊन संवाद साधताना स्थानिक प्रश्न, विकासकामांची दिशा आणि भविष्यातील अपेक्षा यावर भर देण्यात आला. केवळ घोषणा नव्हे, तर “प्रभागाचा सर्वांगीण विकास” हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रचार करण्यात आला, हे विशेष.
आजचा प्रचार पाहता प्रभाग क्रमांक १२ मध्ये निवडणूक लढत केवळ व्यक्तींची न राहता संघटना, नियोजन आणि विश्वासार्हतेची बनत चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आगामी दिवसांत हा प्रचाराचा जोर मतदारांच्या निर्णयावर कितपत प्रभाव टाकतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
