जळगाव | विशेष प्रतिनिधी
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जळगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना एबी फॉर्म अधिकृतपणे प्रदान करण्यात आले. या प्रक्रियेमुळे मनसेच्या निवडणूक तयारीला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे.
मनसेचे एबी फॉर्म जळगाव शहर महानगर अध्यक्ष किरण तळेले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. हा क्षण जळगावच्या राजकारणात नव्या निर्धाराची, शिस्तीची आणि आक्रमक लढ्याची सुरुवात दर्शवणारा मानला जात आहे.
राजसाहेब ठाकरे यांच्या स्पष्ट आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात मनसेने निवडणूक रणनिती आखली असून, संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग देण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मनसेचा हा टप्पा शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध राजकारणाचा संदेश देणारा ठरत आहे.
महानगर अध्यक्ष किरण तळेले यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभागांतील उमेदवार सज्ज झाले असून, बूथनिहाय तयारी, मतदारांशी संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्यावर भर देण्यात येत आहे.
“विकास, स्वाभिमान आणि जळगावच्या नव्याने घडणीसाठी” मनसेचा झेंडा प्रत्येक वॉर्डात प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस भूमिका, स्थानिक प्रश्नांवर सक्रिय हस्तक्षेप आणि शिस्तबद्ध संघटन, हा मनसेचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. एबी फॉर्म वितरणानंतर उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, जळगाव महापालिका निवडणूक अधिक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
