✒️ संपादकीय : “निवडणुकीचा उत्सव की ‘बाजार’? महाराष्ट्रात लोकशाहीचा शिमगा!”
जनता लाईव्ह :– लोकशाही म्हटलं की निवडणूक हा उत्सव जनतेचा, लोकशक्तीचा, मूल्यांचा आणि संविधानाचा! पण दुर्दैवाने आज महाराष्ट्रात, विशेषतः जळगाव जिल्ह्यात जे काही दिवसभर घडलं त्याला उत्सव म्हणण्यापेक्षा तमाशा म्हणावं असं चित्र होतं. पण तमाशाही बदनाम होईल म्हणून तो शब्दही येथे योग्य वाटत नाही.
मतदानाच्या दिवशी पैशांचा अक्षरशः महापूर वाहताना पाहायला मिळाला. नोटांची बंडलं जप्त झाली, तर काही जण बोकांडी पिशव्या घेऊन उचलून पळताना व्हिडिओमध्ये दिसले. खुलेआम मतांचे भाव ठरत होते. विचार करा कार्यकर्तेच जर व्यवहारासाठी इतके उतावीळ आणि बेधडक असतील तर निवडून आलेले प्रतिनिधी किती पटीने हा खर्च वसूल करतील? लोकशाही निवडणूक की शेअर बाजार हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या रस्त्यांवर उभा होता.
जामनेर आणि मुक्ताईनगरमध्ये दिवसभर राडे, पैसे आणि सत्ता यांची भाषा चालली. मुक्ताईनगर मध्ये तर आमदार आणि खासदार यांच्या एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप फेरा संपता संपत नाही, हा प्रकार छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्या भूमीत होत असेल तर आपण कोणत्या भयमुक्त निवडणुकांबद्दल, कोणत्या संस्कृतीबद्दल बोलतो आहोत?
यात भर म्हणजे निवडणूक आयोगाचा कारभार हा पूर्णपणे गोंधळलेला आणि संशयास्पद. मतमोजणी २१ तारखेला पुढे ढकलणे, काही ठिकाणी मतदान रद्द करणे, काही ठिकाणी निर्णय बदलणे हे निवडणूक आयोग चालवत आहेत की कोणी दुसरं हा प्रश्न गंभीर आहे. औरंगाबाद खंडपीठाने स्पष्टपणे आयोगाला सुनावलं आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. लाखो रुपयांचा खर्च, शेकडो तासांची मेहनत वाया गेली जबाबदार कोण?
मतदार याद्यांतील त्रुटी, वारंवार बदल, प्रशासनाची बोटचेपी भूमिका या सर्वांनी निवडणूक आयोगाची विश्वसनीयता पूर्णपणे हादरली आहे. आज परिस्थिती अशी आहे की लोकशाही प्रक्रिया नव्हे तर “ऑपरेशन पकड-धरा-पाडा” चालू आहे. विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंनी एकमेकांचे पैसे पकडून देण्याचा खेळ सुरू आहे.
आणि तरीही वरून मोठा नारा “वन नेशन, वन इलेक्शन!”
प्रश्न असा की, जेव्हा एवढ्या छोट्या स्थानिक निवडणुकीतच तुम्ही पास होऊ शकत नाही तेव्हा संपूर्ण देशाची संयुक्त निवडणूक कशी सांभाळणार? आज महाराष्ट्राने लोकशाहीची खरी अवस्था पाहिली तिची विदारक, विकृत आणि विकली गेलेली रूपं.
लोकशाहीचा उत्सव नाही हा लोकशाहीचा शिमगा होता.
आणि हा शिमगा थांबवण्याची वेळ आता आली आहे… नाहीतर पुढचा शब्द शेवटचे संस्कार असेल.

Stargame, yeah? Seems like a solid option. Pretty standard fare, but hey, sometimes that’s all you need. If you ain’t got anything else going on, stargame might just scratch that itch.
Sara777rate – Couldn’t really find what the ratings were all about on the site, but the concept is interesting! Always good to check the rates before jumping in. Consider browsing their ratings at sara777rate!