“सोन्याच्या ओट्यापुढे झुकलेली मनपा?”
जनता लाईव्ह विशेष संपादकीय | जनहितार्थ लेख
जळगाव : शहरात “कायद्याचा डंका” वाजवणारी आणि रोजंदारीवरच्या गरीब विक्रेत्यांवर अतिक्रमणाची तलवार चालवणारी जळगाव महानगरपालिका आज स्वतःच जनतेच्या न्यायालयात उभी आहे. कारण सोन्याच्या दुकानासमोर उभारलेला ‘सोन्याचा ओटा’ दोन वर्षांपासून कायद्यालाच गहाण ठेवून बसला होता!

१४ ऑक्टोबर २०२५ रोजी मनपाच्या अतिक्रमण विभागाने संबंधित दुकानदाराला नोटीस बजावली. मात्र दुकानदाराने दिवाळी सिझन संपेपर्यंत मुदत मागत अर्ज दिला आणि आश्चर्य म्हणजे त्या एका अर्जानेच प्रशासनाची संपूर्ण मोहीम थांबली! “एक अर्ज आणि मनपाचे हातपाय बांधले गेले!”

शहरातील फेरीवाल्यांची गाडी जप्त करायला मनपाचे अधिकारी सज्ज असतात; पण सोन्याच्या दुकानासमोर मात्र तीच मनपा मूक आणि नम्र झाली होती. सोन्याचा ओटा कायद्यापेक्षा मोठा आहे का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात ठसठसत होता.
‘जनता लाईव्ह’चा दबाव आणि प्रशासनाची जाग जनता लाईव्हने ही बाब जनहितार्थ मांडल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली! आजच त्या दुकानदाराने स्वतःचा अतिक्रमित ओटा स्वखर्चाने तोडून घेतला आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. जनता लाईव्हच्या बातमीनेच प्रशासनाला आरसा दाखवला, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बातमीची ताकद म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर जनतेच्या आवाजाला दिलेला मंच आहे हे या घटनेने दाखवून दिलं.
मनपा सर्वांसाठी एकच कायदा का नाही? एका गरीब फेरीवाल्याची गाडी किंवा एका आजीबाईंचे छोटे घर एका दिवसात जमीनदोस्त करणारी मनपा सोन्याच्या दुकानासमोर मात्र हतबल का होते?
“पत्र आले म्हणून थांबलो” हा कारणवजा बहाणा की काहीतरी वेगळं घडलं या मौनातून भ्रष्टाचाराची सावली दिसते आणि नागरिक विचारतात “मनपा कायद्याने चालते की पैशाने?”
पत्र इतकं ताकदवान की कायदा निष्प्रभ? अतिक्रमण विभागाकडे पूर्ण अधिकार असतानाही एका साध्या विनंतीपत्रामुळे संपूर्ण कारवाई थांबवली गेली. मग प्रश्न असा कायद्यापेक्षा जास्त शक्ती या “पत्रात” होती का? की त्यामागे काही सुवर्ण सूत्रं दडली होती?
जनहिताचा पुढचा टप्पा बेसमेंटमधील व्यापारी अतिक्रमण शहरात असेच अनेक अतिक्रमण आहेत अपार्टमेंट धारकांनी पार्किंगसाठी मंजूर केलेल्या बेसमेंटमध्ये बिनदिक्कत व्यवसाय सुरू केले आहेत. हेही अतिक्रमण नागरिकांच्या श्वासावर गदा आणत आहेत.
जनता लाईव्ह या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करत राहील. कारण आमचं उद्दिष्ट एकच सामान्य जनतेला न्याय मिळावा आणि प्रशासनाला जबाबदार ठरवावं!
शेवटचा सवाल मनपा “पत्रानुसार” चालते की “पैशानुसार”? आज सोन्याचा दुकानासमोरील पक्का ओटा तोडला पण मनपाचा अहंकार अजून शाबूत आहे का?
नागरिक विचारतात “मनपा सोन्याच्या ओट्यापुढे झुकली का, की जनतेच्या आवाजाने जागी झाली?”

That’s fascinating! The blend of tradition & tech at legend link apk really caught my eye – almost like a digital sakla experience! It’s cool seeing Filipino culture honored in online gaming. Definitely checking it out! ✨