जनता लाईव्ह :– सिंगल यूज प्लास्टिकवर मनपाची कठोर मोहीम रॉयल डायनिंग हॉलवर ५००० हजार रुपयांचा दंडात्मक कारवाई जळगाव शहरातील पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या “सिंगल यूज प्लास्टिक विरोधी अभियान” अंतर्गत आज दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी महापालिका प्रशासनाने आणखी एक ठोस पाऊल उचलले.

मा. आयुक्त सो यांच्या आदेशान्वये, तसेच मा. अतिरिक्त आयुक्त सो व सहाय्यक आयुक्त (आरोग्य) यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्र. ५ नवी पेठ येथील रॉयल डायनिंग हॉल येथे तपासणी करण्यात आली. या दरम्यान प्लास्टिक कंटेनरचा वापर व साठा आढळल्याने ₹५००० दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित प्लास्टिक सामग्री जप्त करून नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.
या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रुपेश भालेराव, प्रदीप धापसे, धीरज गोडाले, आणि रवी संकत आदी अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेने या माध्यमातून शहरातील व्यावसायिकांना स्पष्ट संदेश दिला आहे की, पर्यावरणाचा विनाश करणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
महापालिका प्रशासनाने नागरिक आणि व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, प्लास्टिकच्या ऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा आणि शहर स्वच्छ, हरित आणि निरोगी ठेवण्यासाठी सहकार्य करावे.
