सोन्याच्या ओट्यापुढे झुकलेली मनपा अतिक्रमण हटवणारे अधिकारी व्यापाऱ्यांसमोर हतबल का झाले?
जळगाव : आशिया खंडातील सर्वात उंच इमारत म्हणून जळगाव मनपा आपली ओळख मिरवते. परंतु, गेल्या काही काळात ती आपल्या कामगिरीपेक्षा “वादग्रस्त कारभारामुळे” अधिक चर्चेत असते. आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे मनपा सर्वांसाठी एकच कायदा आहे का, की श्रीमंतांसाठी वेगळा? मागील काही दिवसापूर्वी आमच्या न्यूज पोर्टल मार्फत बातमी प्रसारित करण्यात आली होती की सुभाष चौकातील सोन्याचा दुकानासमोरील पक्का ओटा हा रहदारीला अडथळा ठरत असून त्यामुळे हे अतिक्रमण महानगरपालिकेमार्फत काढण्यात यावे यासंदर्भात महानगरपालिकेने आपले काही अधिकारी व कर्मचारी या सुवर्णनगरीत पाठवल्यानंतर सुवर्ण दुकानात धारकाकडून अधिकाऱ्यांना मात्र एक मुदत वाढीचा पत्र मिळालं व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना माघारी फिरावे लागले.
अतिक्रमण हटवण्याचा अधिकार कुठे हरवला सुभाष चौकातील सोन्याच्या दुकानासमोर उभारलेला पक्का ओटा गेल्या दोन वर्षांपासून कायम आहे. नागरिकांच्या तक्रारी माध्यमांतील बातम्या चर्चेचा गदारोळ तरीही मनपा प्रशासन मौन का पाळते आहे.अतिक्रमण विभागाने तपासणी केली, दुकानदाराकडून “मुदत वाढीचे पत्र” घेतले आणि… बस्स! तिथेच सर्व थांबले. मग प्रश्न असा एका सामान्य फेरीवाल्याला मनपा तात्काळ दंड करते पण सोन्याच्या दुकानासमोर हतबल का होते?
“पत्र” इतकं शक्तिशाली की मनपा हतबल?महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे कायद्याने अतिक्रमण तोडण्याचा अधिकार आहे. पण एका साध्या अर्जामुळे ते मालकाच्या आज्ञेविना हलूच शकत नाहीत का? नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा व्यवहार झाले का मनपा व व्यापाऱ्यात काही रंगले का या चर्चा सोशल मीडियावर जोरात आहेत.
गरीबांवर कारवाई, श्रीमंतांवर कृपा! काही महिन्यांपूर्वी एका आजीबाईचे छोटेसे घर मनपाने एका दिवसात जमीनदोस्त केले. तेव्हा मनपाचा ‘बाहुबली ताफा’ पाहायला मिळाला. पण सोन्याच्या दुकानासमोर मात्र तीच मनपा अचानक मूक झाली. “मै झुकूंगा नाही” अशी म्हण आठवते, पण इथे दिसते ते वेगळं चित्र मनपा या सुवर्ण व्यापारासमोर झुकलेली आहे का?
कायद्याच्या अंमलबजावणीचा दुहेरी मापदंड महानगरपालिकेला कायद्याचे पालन करायचे आहे, पण कायदा जर काही लोकांसाठीच लागू होत असेल तर ही गंभीर बाब आहे. मनपाचे हे मौन भ्रष्टाचाराची छाया दाखवते का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
मनपा एका लेखी पत्रानुसार चालते का की मर्जीप्रमाणे चालते आणि जर सोन्याच्या दुकानासमोरचा ओटा तोडण्यासाठीसुद्धा सोन्याचा व्यवहार लागतो, तर नागरिकांचा विश्वास कसा टिकणार?
