
“आनंदाचा शिधा” — मनसेची जनसंपर्काची गोड भेट!
जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे “आनंदाचा शिधा” हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. फक्त २१ रुपये किलो दराने साखर वाटप करून मनसेने समाजातील गोरगरीब कुटुंबांच्या दिवाळीमध्ये गोडवा आणला. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये खऱ्या अर्थाने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी सरकारकडून मिळणाऱ्या “आनंदाच्या शिध्याची” केवळ आश्वासने शिल्लक राहिली असताना, मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजातील गरजूंपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचे काम केले. “सरकारने नाही दिला, पण मनसेने आनंद दिला” असे वक्तव्य अनेक महिलांकडून ऐकायला मिळाले, हेच या उपक्रमाचे यश दर्शवते.
मनसे वार्ड क्रमांक ११ व महिला शाखा, हरी विठ्ठल नगर शाखेच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, शाखा अध्यक्षा अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, अॅड. सागर शिंपी, रज्जाक सय्यद, दीपक राठोड, विकास पाथरे आदींची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
हा उपक्रम केवळ साखर वाटपापुरता मर्यादित नसून, मनसेची सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी असलेले नातं अधोरेखित करणारा ठरला आहे.
सणासुदीच्या काळात जेव्हा राजकीय पक्ष जनतेपासून दूर राहतात, तेव्हा मनसेने “आनंदाचा शिधा” देत जनतेच्या मनात स्थान मिळवले आहे.
👉 ही केवळ साखरेची गोडी नाही — तर मनसेच्या कार्यपद्धतीतील माणुसकीची चव आहे!