
जळगाव – महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची महत्त्वपूर्ण बैठक जळगाव येथे संपन्न झाली. या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. जळगाव तालुका उपाध्यक्ष म्हणून आकाश सोनार व नरेश चनाल, सहसचिव विजय गवळी, भडगाव तालुका सचिव पुष्कराज पाटील, जळगाव शहर संघटक मंगेश पाटील, आणि शहर उपाध्यक्ष समाधान न्हावी यांची निवड करण्यात आली.
या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव मा. अमोल भिसे, संस्थापक मारुती दुनगे, आणि जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आल्या.
बैठकीदरम्यान राज्य सचिव अमोल भिसे यांनी सांगितले की, “जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.” त्यांनी प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देशही दिले.
संस्थापक मारुती दुनगे यांनी शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पूरक व्यवसायांची माहिती देण्याचे, तसेच त्यांच्या उत्पादनांना एक्सपोर्ट क्वालिटी मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे. कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास थेट संघटनेशी संपर्क साधावा. तसेच प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी नाममात्र दरात कृषी अवजारे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या बैठकीस जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, बंटी शर्मा, जिल्हा सचिव अमोल पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, विनोद पाटील, तालुका उपाध्यक्ष किशोर वाघ, विलास सोनार, संदीप मांडोळे, सचिन पवार, राहुल चव्हाण, दिपक राठोड, भुषण ठाकुर, अनिता कापुरे, लक्ष्मी भिल आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्या, शासकीय योजनांचा लाभ, तसेच शेतीतील नवीन तंत्रज्ञान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.