
जळगाव, दिनांक ७ ऑक्टोंबर (जिमाका वृत्तसेवा):
जिल्ह्यात,माहिती अधिकार सप्ताह, ५ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त माहिती अधिकार कायदा २००५ या विषयावर ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राला, राज्य माहिती आयुक्त, श्री.भूपेंद्र गुरव, राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक, अध्यक्षस्थानी असणार आहेत. चर्चासत्राला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील, जन माहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी, सामान्य नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैशाली चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.