
📰 शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावणे बंधनकारक – नियम न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई
मुंबई, दि. १० सप्टेंबर २०२५ – राज्य शासनाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. कार्यालयात प्रवेश करताना व कामकाजाच्या वेळेत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सध्या बऱ्याच शासकीय कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी हे ओळखपत्र न घालता काम करताना दिसतात. या कार्यालयांत विविध कामानिमित्त ठेकेदार, एजंट किंवा किरकोळ कारणाने नागरिक येत असतात. त्यामुळे खरा अधिकारी-कर्मचारी कोण आणि बाहेरचा व्यक्ती कोण हे ओळखणे अवघड होते. यामुळे सुरक्षेचा व शिस्तीचा प्रश्न निर्माण होतो.
सामान्य प्रशासन विभागाच्या या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी २०१४ व २०२३ मध्येही अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही अधिकारी व कर्मचारी ओळखपत्र न लावता कार्यालयीन कामकाज करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर भूमिका घेतली असून, आता पुढे कार्यालयात प्रवेश करताना अथवा कार्यालयात असताना ओळखपत्र न लावणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या नियमाची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध असून, ते डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध करण्यात आले आहे.
👉 यामुळे पुढील काळात शासकीय कार्यालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांची पारदर्शकता व शिस्तबद्धता वाढण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आह