
📰 पीडित महिला एफआयआरसाठीच आली नाही; मणियार बंधूंवर चौकशीचे ढग….
जळगाव/चाळीसगाव – स्थानिक गुन्हा शाखेच्या निरीक्षकाने महिलेचे शोषण केल्याचा गंभीर आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला होता. बैठकीतून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांसमोर आयुष व पियुष मणियार या दोघा भावांची थेट नावाने उघडझाप केली. या भावंडांनी निरीक्षक संदीप पाटील यांना मदत केली असल्याचा दावा करून, “त्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत, पण त्यांचा व्यवसाय नेमका कोणता?” असा प्रश्न उपस्थित केला होता.
याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्राथमिक जबाब नोंदवला खरा; मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी औपचारिक गुन्हा नोंदवायला येण्याचे आश्वासन देऊनही ती आली नाही. त्यामुळे प्रकरण गुन्हा नोंदणीच्या उंबरठ्यावर थांबले आहे.
दरम्यान, मणियार बंधूंना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते जळगावात नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. “त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल,” असे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण घडामोडीत राजकीय आरोप–प्रत्यारोप आणि पोलिस चौकशी यामुळे वातावरण तापले आहे. पीडित महिला पुढे येत नसेल, तर आरोपांचे काय होणार? आणि आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न कितपत गांभीर्याने घेतले जातील? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
आ. मंगेश चव्हाण यांची पत्रकारांशी शेवटची टिप्पणी ठळक ठरेल का.?– “मैं जो बोलता हुं, वो मैं करता हुं.”
आयुष मणियार व पियुष मणियार या दोन्ही भावांचा पोलिस प्रशासनाशी एवढा जवळीक का आहे, यावर अनेक चर्चा होत आहेत. यामागे काही ठळक मुद्दे पुढे येतात :
1. शस्त्र परवाने –
या दोघांकडे शस्त्र परवाने आहेत. शस्त्र परवाना सहजासहजी मिळत नाही. तो देताना संबंधित व्यक्तीचा व्यवसाय, वैयक्तिक सुरक्षेची गरज, आर्थिक पार्श्वभूमी, तसेच पोलिसांशी असलेला संबंध यांची कसून चौकशी केली जाते. यामुळे “त्यांचा व्यवसाय नेमका कोणता?” असा प्रश्न आमदार मंगेश चव्हाण यांनी सार्वजनिकरीत्या उपस्थित केला.
2. स्थानिक गुन्हे शाखेशी संबंध –
निरीक्षक संदीप पाटील यांच्या समर्थनासाठी किंवा मदतीसाठी हे भाऊ पुढे आलेत, असा आरोप आमदारांनी केला आहे. यावरून त्यांचा पोलिस यंत्रणेतील काही प्रभाव किंवा जवळीक असल्याची चर्चा अधिकच गडद झाली आहे.
3. सामाजिक–राजकीय संपर्कजाळे –
काही स्थानिक व्यापारी, ठेकेदार, किंवा व्यवसायिक राजकीय नेत्यांशी व पोलिसांशी संबंध ठेवतात, जेणेकरून परवाने, ठेके, किंवा प्रशासकीय कामे सोपी होतात. मणियार बंधूंचा असा काही संपर्क आहे का, याची चर्चा सुरू आहे.
4. प्रशासनाची गुप्त साथ? –
एवढ्या गंभीर प्रकरणात त्यांना तातडीने चौकशीसाठी हजर न करता “ते जळगावात नाहीत” असे कुटुंबीयांकडून सांगितल्यावर पोलिसांनी थांबले, हे लोकांच्या शंकेला अधिक वाव देणारे ठरले.
👉 एकंदरीत, मणियार बंधू आणि पोलिस प्रशासनातील जवळीक ही सामान्यांच्या नजरेत संशयास्पद ठरली आहे.
हा प्रश्न राजकीय पातळीवरून पुढे आल्यामुळे आता चौकशीची दिशा अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.