
जळगाव | वृत्तसेवा महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील गंभीर अनियमिततेप्रकरणी अखेर सात महिन्यांनी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना निलंबित करण्यात आले असून, याबाबतचा अधिकृत आदेश आज आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते जारी करण्यात आला.
https://www.facebook.com/share/v/1FLHxi6bvh/
त्रिसदस्यीय चौकशी, ठपका आणि निर्णय महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या जागी तिचा पती शासनाचे सॉफ्टवेअर हाताळताना आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर आमच्या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वास्तव बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर महापालिकेकडून डॉ. घोलप यांच्यावर त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती.
समितीने चौकशीदरम्यान, संबंधित पतीने “मी डॉ. घोलप यांच्या सांगण्यावरून काम करतो” असे स्पष्ट केल्याचे नमूद केले. यावरून डॉ. घोलप यांना दोषी ठरवत कारवाईची स्पष्ट शिफारस करण्यात आली होती.
उपायुक्त पंकज गोसावी यांनी हा अहवाल आयुक्तांकडे सादर केला आणि त्यानुसार आज अखेर निलंबनाची कारवाई अमलात आणण्यात आली.
गैरवर्तन, पैशांची मागणी आणि आता निलंबन
या प्रकरणाखेरीज, डॉ. घोलप यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयातील सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन, तसेच त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांकडून जन्म/मृत्यू दाखल्यासाठी पैशांची मागणी केल्याचे पुरावेही व्हायरल झाले होते. संबंधित व्हिडिओ क्लिप्स सोशल मिडीयावर प्रसारित झाल्यानंतर प्रकरण अधिक गडद बनले होते.
प्रतिनिधींचा सततचा पाठपुरावा ठरला निर्णायक
या प्रकरणी आमचे प्रतिनिधी सतत पाठपुरावा करत होते. पुराव्यांच्या आधारे विविध व्हिडिओ चित्रफिती व दस्तऐवजीक पुरावे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आले. यामुळेच अखेर प्रशासनाला निलंबनाचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले.
प्रशासनाची निर्णायक कारवाई
सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिकेने निर्णायक पाऊल उचलले असून, डॉ. घोलप यांचे निलंबन ही संपूर्ण प्रकरणात महत्त्वपूर्ण आणि उदाहरणार्थ ठरणारी कारवाई ठरली आहे. पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत ते मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत राहणार नाहीत.
♦️आता लैंगिक छळाच्या प्रकरणातही टांगती तलवार
निलंबनाच्या कारवाईनंतरही डॉ. विजय घोलप यांच्यावर आणखी एका गंभीर प्रकरणाची तलवार टांगतीच आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील सहकारी महिला अधिकाऱ्याने लैंगिक छळाचे आरोप घातले असून, या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. विशेष म्हणजे, घोलप यांनी आपल्या चुकीची कबुली स्वतः ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून दिलेल्या माफीनाम्यात दिली आहे. हा माफीनामा पीडित महिलेकडे सुपूर्त झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
♦️फौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता
या प्रकरणात डॉ. घोलप यांच्यावर २ फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मागणीसाठी प्रशांत नाईक यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी सतत पाठपुरावा करत आहेत.
पीडित महिलेकडून लवकरच अधिकृत जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर समिती आपला अहवाल अंतिम करत आयुक्तांकडे सादर करणार आहे. यामुळे डॉ. घोलप यांना आणखी एक मोठा झटका ाची शक्यता…