
जनता लाईव्ह:–हनी ट्रॅप वादात जळगाव जिल्हा आघाडीवर? जामनेर-मुक्ताईनगरात नेत्यांची ‘जुगलबंदी’ चर्चेत!
राज्यभरच नव्हे तर संपूर्ण देशभर गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि मुक्ताईनगर हे दोन तालुके विशेषतः चर्चेत आले आहेत. या हनी ट्रॅप प्रकरणात केवळ स्थानिक नाही तर राज्यातील आमदार, खासदार, मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सहभाग असल्याचा दावा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर जामनेरचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या एकेकाळच्या निकटवर्तीयांपैकी असलेले प्रफुल लोंढा यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत.
प्रफुल लोंढा हे पूर्वी महाजन यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जात होते. मात्र कालांतराने या दोघांमध्ये वाद वाढले आणि लोंढा नी इतर पक्षांतील नेत्यांशी जवळीक साधायला सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर तसेच एकनाथराव खडसे यांच्यावर वेळोवेळी गंभीर आरोप करत पत्रकार परिषदांमधून टिकास्त्र सोडली. कोणी म्हणतो “हॉटेलात तीन महिने पाय चेपत बसले”, तर कोणी म्हणतो “गुलाबाचं फुल देताना ‘ये रिश्ता क्या कहलाता है'” म्हणणं आलं.
ही राजकीय जुंपणी फक्त वैयक्तिक बदनामीपुरती मर्यादित राहिली नसून, जिल्हा किंवा तालुक्याच्या विकासाचा कुठेही विचार झाला नाही, असा नागरिकांचा सूर आहे.
अशा परिस्थितीत या नेत्यांनी सार्वजनिक जीवनात राहण्याचा किंवा उच्च पदांचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न निर्माण होतो आहे.
या सर्व बाबींमध्ये जो सामान्य जनतेने यांच्यावर विश्वास दाखवून निवडून दिले त्या जनतेच्या विकासाचा काय अलीकडेच एका बातमीपत्र झाली जामनेर तालुक्यातील एका गावातील शाळेच्या मुलींसाठी बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही असे गंभीर प्रश्नावरती काहीही न करता मात्र हानीट्रॅपच्या हनी मध्ये गुंग झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
यात प्रफुल लोंढे यांनी केलेले आरोप हे सत्य आहेत का आणि हे सत्य लपवण्यासाठी या सर्वांची धडपड सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होतो.?
🔹 वाचक मित्रांनो, तुमचं मत काय?
जळगाव जिल्ह्यातील अशा राजकारणावर तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर नोंदवा.
आपली मते आम्ही पुढच्या बातमीत समाविष्ट करू.