
जळगावातील नामांकित हॉटेल रॉयल पॅलेस येथे मध्यरात्री एलसीबीची धाड –जुगारअड्ड्यावर व्यापारी ताब्यात, पण हॉटेल व्यवसायिक मात्र ‘बेदाग’?
पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर सुरू होता ‘हाय प्रोफाईल’ जुगार!
जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी, अगदी पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थाच्या काही अंतरावर असलेल्या हॉटेल रॉयल पॅलेस मध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकत आठ व्यापाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर हॉटेल हे इतके नामांकित आहे की, जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक मान्यवर येथे वारंवार भेट देत असतात. पण याच हॉटेलच्या खोलीत सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर कारवाई झाल्यानंतरही सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – हॉटेलच्या मालकावर अजूनतरी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही!
हॉटेलमध्ये सुरू होतो जुगार, पण मालक निर्दोष?
एलसीबीच्या कारवाईत आठ व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची नावेही समोर आली आहेत. पप्पु सोहम जैन, भावेश पंजोमल मंधान, रुखील, मदन सुंदरदास लुल्ला, सुनील करलाल वालेचा, अमित राजकुमार वालेचा,विशाल दयानंद नाथानी, कमलेश कैलाशजी सोनी, मात्र एवढ्या गंभीर प्रकारानंतरही हॉटेलच्या व्यवस्थापनावर किंवा मालकावर गुन्हा नोंदवला गेलेला नाही, हे विशेष संशयास्पद मानले जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच असा प्रकार सर्रास सुरू असेल, तर संपूर्ण जिल्ह्यातील हॉटेल ची अशी परिस्थितीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात सर्वत्र चर्चा सुरू – हॉटेलचा वरदहस्त कोणाचा?
या प्रकरणातून अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात –
इतक्या उच्चस्तरीय पोलीस निवासस्थानाच्या समोरच जुगार खेळला जातो, आणि कोणालाच त्याची कल्पना नाही?
हॉटेल व्यवस्थापक किंवा मालकाविरोधात अद्याप कारवाई न होणं, हे काय दर्शवते?
या कारवाईने पोलीस यंत्रणेवर अनेक संशयाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिकांमध्ये संतापाची लाट असून “सामान्य माणूस जरी चुकला तर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल होतो, मग अशा हाय प्रोफाईल हॉटेलमालकांना मोकळं सोडण्यामागे नक्की कारण काय? असा सवाल उपस्थित होतोय.
प्रशासनाकडून पारदर्शक कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. अन्यथा पोलीस यंत्रणेवरील विश्वासच डळमळीत होईल,