
प्रतिनिधी जळगाव– शहरातील सागर पार्क मैदानाजवळील उच्चभ्रू हॉटेल रॉयल पॅलेस येथे सुरू असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या धाडीत आठ हाय प्रोफाईल जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ७ लाख रुपयांची रोख रक्कम व इतर जुगार साहित्य, मोबाईलसह एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पप्पू सोहम जैन, भावेश पंजोमल मंधान, मदन सुंदरदास लुल्ला, सुनील शंकरलाल वालेचा, अमित राजकुमार वालेचा, विशाल दयानंद नाथानी आणि कमलेश कैलासजी सोनी यांचा समावेश आहे.
या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनमध्ये जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.
शहरातील उच्चभ्रू वर्तुळात हॉटेलच्या आड चालणाऱ्या या जुगार अड्ड्यावर कारवाई झाल्याने प्रशासन आणि नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.