जनता लाईव्ह :-जळगाव | मागील दहा वर्षापासून जळगाव शहराला आमदार सुरेश भोळे यांच्या सारखे नेतृत्व लाभले असून त्यामुळे आमच्या अनेक समस्या सुटल्या आहे. भविष्यात देखील शहराच्या विकासासाठी आम्हाला आमदार म्हणून सुरेश भोळे हेच हवे असल्याचे सांगत अखिल भारतीय मराठा महासंघाने आमदार भोळे यांना पाठिंबा दिला आहे याबाबतचे पत्र त्यांनी रविवारी पक्ष कार्यालयात आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्याकडे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सुपूर्त करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख बी.बी. भोसले, उपाध्यक्ष विश्वास पाटील, ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष उन्मेश पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील भडगाव तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील चाळीसगाव तालुक्याचे अध्यक्ष रमेश पाटील यांसह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे विक्रम तरसोडिया, अजित राणी नीलू आबा तायडे परेश जगताप, संपर्कप्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते. या पाठींब्याबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे आभार मानले व सदैव आपल्या सेवेत राहण्याचे व विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.

Like a fine prone on the whole square direction of