
अर्ध सैनिक बलातील जवानांच्या न्यायहक्कांसाठी मनसे चा ठाम आवाज
देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अर्ध सैनिक बलातील जवानांच्या व्यथा आणि गरजा याकडे आता लक्ष दिले जात आहे, हे अत्यंत आश्वासक आहे. जळगाव जिल्ह्यातील निवृत्त अर्ध सैनिक बलातील जवान व शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीयांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले.
महत्वाच्या मागण्या: अर्ध सैनिक बलाचे कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे.
जिल्ह्यातील सर्व निवृत्त जवानांची सैनिक कार्यालयात नोंदणी व्हावी.
सेवा बजावताना वीरमरण आलेल्या जवानांचे शहीद स्मारक त्यांच्या गावी उभारण्यात यावे. नगरपालिका/ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घर असलेल्या जवानांना घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये १००% सूट द्यावी. निवृत्त जवानांना योग्य सन्मान व सरकारी योजनांचा लाभ मिळावा.
या मागण्यांवर जिल्हाधिकारी महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याकरता जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत ठामपणे उभं आहे.”
त्याचप्रमाणे, वीरमरण आलेल्या जवानांचे शहीद स्मारक त्यांच्या गावातच उभारण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासनही त्यांनी दिले.
मनसे राजकीय स्तरावर पाठपुरावा करणार ..
याविषयी लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांची भेट घेऊन अर्ध सैनिक बल कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी ठोस पाठपुरावा केला जाणार आहे. अर्ध सैनिक बलातील जवानांचे योगदान शब्दात मावणारे नाही. मात्र, त्यांच्या समस्या, गरजा आणि व्यथा समजून घेऊन शासन आणि समाजाने त्यांना न्याय देणं ही आपली जबाबदारी आहे. या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या जवानांसोबत आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांनी दिली.