
जनता लाईव्ह:–तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांचे कार्यालयातील देखभाल व दुरुस्तीचे कामाची चौकशी होणे बाबत नितीन सुरेश रंधे राहणार नशिराबाद तालुका जिल्हा जळगाव
कार्यकारी अभियंता जळगाव पाठबंधारे विभाग जळगाव, या कार्यालयांतर्गत असलेले हातनूर धरण, सुखी, अंभोरा, बहुळा, अग्नावती व इतर धरणांचे व कालव्यांचे देखभाल दुरुस्तीचे कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार व भ्रष्टाचार झालेला आहे. त्याबाबत मी सतत पाठपुरावा करीत आहे या संदर्भात माझे संदर्भीय पत्रांची प्रत मी आपल्या सुलभ माहितीसाठी सोबत सादर करीत आहे. या कामाचे चौकशी संबंधित मी यापूर्वी सुद्धा दिनांक 17/06/2023 रोज पासून माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयासमोर उपोषनाला बसलो होतो. त्यावेळी माननीय अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव यांचे कार्यालयातील आदेश क्रमांक १९७ / सन २०२३ जा.क्र./प्रति./२१७८ दि. १७/०७/२०२३ अन्वये सदर कामाची चौकशीसाठी श्री. एन. एम. व्हट्टे कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग धुळे, यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आज तागायत त्यांनी केलेला चौकशीचा अहवाल व चौकशी केलेली नाही.
तसेच त्याच दरम्यान मा. कार्यकारी संचालक तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव यांनी मा. अधीक्षक अभियंता दक्षता पथक मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे यांचे मार्फत होणारी थर्ड पार्टी चौकशी करण्यात येईल असे त्यांचे दिनांक १७/०७/२०२३ चे पत्रात म्हटले होते त्यानुसार मी १९/०७/२०२३ रोजी संध्याकाळी ०६.०० ते ०६.२० वाजता उपकार्यकारी अभियंता व लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव यांचे कार्यालयात सहाय्यक अधीक्षक अभियंता यांनी समक्ष उपोषणस्थळी येऊन भेट दिली व चौकशीसाठी संमती दिली. जा.प.क्र./ कडा / प्र.ली. २१८२ रु. सन / / २०२३ ते दिनांक २०/०६/२०२३ या मध्यंतरीचे काळात मा. अधीक्षक अभियंता, दक्षता पथक मुंबई परिमंडळ, पाटबंधारे विभाग ठाणे यांचे रजिस्टर पोस्टाने पत्र क्रमांक द.प./मु.प./ठाणे /द.प.१ /(२०/२०२३) /१२३ सन २०२३ दिनांक १८/०८/२०२३ अन्वये मला तक्रार अर्ज मीच केला आहे किंवा नाही याची विचारणा झाली व चर्चेसाठी पंधरा दिवसात येण्याचे आम्हाला आमंत्रित केले.
त्यानंतर मा. अधीक्षक अभियंता, दक्षता पथक ठाणे, यांचे गोपनीय पत्र क्र. द.प./मु.प./ प्र.ली./ठाणे द.प.१/१३१ सन २०२३ दिनांक ०३/१०/२०२३ नुसार माझा खोट्या सहीचा अर्ज जो मी केलेला नव्हता तो दिनांक ०३/०८/२०२३ रोजी चा अर्ज कोणताही सबळ पुरावा व मला चौकशीसाठी न बोलवता मा. कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे व त्यांचा तीन-चार उपविभागीय अभियंता यांनी दक्षता पथक ठाणे यांचे कडे माझ्या सहिचा खोटा अर्ज परस्पर पाठवून त्यांना मॅनेज केले. यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे समजते. यासंबंधी मी आजपर्यंत पाठपुरावा पत्र करीत असून स्वतः ठाणे येथे कार्यालयात जाऊन आलो होतो. तरी मला त्यांचे विरुद्ध न्यायालयात जाण्याची परवानगी मिळावीसन 2021 ते 2024 दरम्यान कार्यरत व सद्य सेवानिवृत्त अधिकारी यांना पुन्हा कामावर घेऊन त्यांनीच हे प्रकरण दाबले आहे त्यात खालील अधिकारी सहभागी आहे. १) एस. एच. चौधरी २) एन.पी. महाजन ३) आर. एस. पांडव ४) एन. बी. शेवाळे ५) श्री.ध. ब. बेहरे या सर्वांवर न्यायालयीन गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी व सह-आरोपी खालील प्रमाणे राहतील.
१) मा. अधीक्षक अभियंता, दक्षता पथक, मुंबई परिमंडळ, पाटबंधारे विभाग, ठाणे. २) कार्यकारी अभियंता जळगाव, पाटबंधारे विभाग जळगाव. ३) उपविभागीय अभियंता अधिकारी हतनूर धरण, सावदा, यावल, चोपडा व पाचोरा यांचे नावे खोट्या सह्या करून परस्पर अर्ज निकाली काढला. याबाबत न्यायालयात जाण्याची परवानगी मिळावी.
या तक्रार अर्जा संबंधी मा. अधीक्षक अभियंता, दक्षता पथक, मुंबई परिमंडळ, पाटबंधारे विभाग, ठाणे यांनी दिनांक ०२/०२/२०२३ यांची भूमिका ही संस्थास्पद असून त्यांनी माझ्या खोट्या सहीचा अर्ज कराव्यास लावून प्रकरण दाबून टाकले आहे व चौकशी न होता नियुक्त अधिकाऱ्यांची चौकशी अहवाल न प्राप्त होता व थर्ड पार्टी तपासणी अहवाल न देता हा सर्व बनवाबनवी प्रकार झालेला आहे. तरी ही चौकशी जर करणार नसेल तर मला न्याय किंवा माझे समाधान कसे होईल त्यासाठी दोन-तीन दिवसात याबाबत पुन्हा चौकशीचे आदेश व्हावे अन्यथा मी दिनांक २४/०३/२०२५ रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचे कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे.