
बूट घालून शहर अभियंत्याचे दीप प्रज्वलन
पालकमंत्री व आमदारांच्या उपस्थितीमध्ये घडला प्रकार जळगाव आशिया खंडामध्ये ज्या महानगरपालिकेची इमारत सर्वात उंच म्हणून प्रसिद्ध आहे त्याच महानगरपालिकेचे शहर अभियंता आज महिलादिनी कार्यक्रमाच्या वेळी पालकमंत्री व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन पायातील पादत्राणे (बूट) घालून केले. जेव्हा की पालकमंत्री व आमदारांनी आपल्या पायातील पादत्राणे काढून दीप प्रज्वलन केले.
आशिया खंडामध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या 17 मजली इमारत या इमारतीमध्ये आज महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका व महिला बालकल्याण विभागातर्फे करण्यात आले होते
या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह उपायुक्त धनश्री, शिंदे, निर्मला गायकवाड महसूल उपायुक्त शहर अभियंता मनीष अमृतकर व उपयुक्त गणेश चाटे हे व्यासपीठावर उपस्थित होते
व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी सर्वप्रथम पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या पायातील पादत्राणे काढून दीप प्रज्वलन केले मात्र शहरा अभियंता मनिष अमृतकर यांनी मात्र सर्व नियम धाब्यावर ठेवून दीप प्रजनन हे आपल्या पायातील पादत्राणे न काढता म्हणजे बूट न करता त्यांनी दीप प्रज्वलन केले.
आज ज्या महिलांनी आपले कर्तृत्व व गाथेने उच्चांक गाठलेल्या अशा विद्यार्थी विद्यार्थिनी महिला यांचा सत्कार करण्यात येत होता त्या ठिकाणी शहर अभियंत्याने आपला एटीट्यूड न सोडता पायात बुटे घालून दीप प्रज्वलन केले जेव्हा की लोकप्रतिनिधी आपल्या पायातील पादत्राने बाजूला काढून दीप प्रज्वलन करत होते.