जनता लाईव्ह :-कोंबड्याचा वाढदिवस उत्साहात साजरा…तोही 31 डिसेंबरला !
कोंबड्याच्या जन्मापासून तर आतापर्यंतचे सगळे फोटोही सांभाळून ठेवलेत !
‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली दारू, मटन पार्टीमध्ये दरवर्षी लाखो कोंबड्यांची पार्टी केली जात असते. एकीकडे असे चित्र असताना,जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर भागातील कापडणे परिवार मात्र, आपल्या कोंबड्याचा पाचवा वाढदिवस साजरा करून सगळ्याचे लक्ष वेधले आहे.
जळगाव शहरातील विक्रम कापडणे हे अनेक वर्ष पासून कोंबडी पालन करीत आहेत.
पाच वर्ष पूर्वी त्यांच्या कोंबडीने काही पिले जन्माला घातली होती. मात्र, त्यात एकच पिलू जिवंत राहिले नव्हते. अशातच कोंबडी ही मांजराने पळून नेल्याने,एकट्या पिलाचा सांभाळ कापडणे परिवाराने गेल्या पाच वर्षपासून केला आहे.
लहानपासून या कोंबड्याला घरातल्या लहान बाळ प्रमाणे सांभाळ केला असल्याने,या कोंबड्याला आणि कापडणे परिवाराला एकमेका विषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे. घरातील सदस्य प्रमाणे पाच वर्ष या कोंबड्याला कापडणे परिवार सांभाळत आहेत. एकतीस डिसेंबर रोजी येणारा वाढदिवसही ते गेल्या पाच वर्ष पासून आवर्जून करत आहेत.
कोंबड्यांचा वाढ दिवस साजरा करताना त्याला हार घालून, औक्षण करून आणि केक भरवत वाढ दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे कापडणे परिवाराने आपल्या कोंबड्याच्या जन्मापासून तर आतापर्यंतचे सगळे फोटो देखील सांभाळून ठेवले आहेत.
गेल्या पाच वर्ष पासून या कोंबड्यांचा सांभाळ करताना,मांजर आणि कुत्र्यांनी या कोंबद्यावर हल्ला करत त्याला जखमी केले होते. मात्र, त्यांच्या तावडीतून सोडवित त्याच्यावर उपचार करून त्याला जीवदान दिल्याचं कापडणे सांगतात.
लहान असताना हे कोंबडीच पिलू चिमणी सारखे दिसत असल्याने त्याच नाव चिमण्या ठेवण्यात आले असून,परिसरात चिमण्या नावाचा कोंबडा आणि त्यांचा सांभाळ करणारे,कापडणे परिवार चर्चेचा विषय बनला आहे.