जनता लाईव्ह :– जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये 9 जानेवारी 2026 रोजी भाजपने राबवलेला जनसंपर्क हा केवळ प्रचार नव्हता, तर संघटनशक्ती, विश्वास आणि जनतेशी असलेल्या नात्याचे जिवंत दर्शन होते. रामदास कॉलनी, प्रभात चौक, जय नगर, विद्या नगर, गुरुकुल कॉलनी तसेच ओमकारेश्वर मंदिर परिसरात घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत भाजपने “विश्वास आणि विकास” ही भूमिका ठामपणे मांडली.
या मोहिमेचे नेतृत्व उमेदवार गायत्री इंद्रजीत राणे (१२-क), नितीन मनोहर बरडे (१२-ड) आणि अनिल सुरेश अडकमोल (१२-अ) यांनी केले. केवळ बॅनर आणि घोषणांपुरता प्रचार न ठेवता नागरिकांच्या प्रश्नांशी थेट भिडण्याची भूमिका या तिघांनी घेतली. रस्त्यांची अवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यावर लोकांशी चर्चा करत उपाययोजनांची स्पष्ट मांडणी करण्यात आली.
या प्रचारात भाजप जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ आणि जळगाव मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष अजित राणे स्वतः रस्त्यावर उतरले होते. त्यांच्यासोबत रणजीत राणे, डॉ. विजय फिरके, जयंत राणे, निरंजन नेमाडे, इंद्रजीत राणे, पंकज पाटील, योगेश भंगाळे, यतीन पाटील, जगदीश जावळे, किरण व उमेश भोळे, हेमराज येवले, दीपक लोखंडे, सुरज चौधरी, नीरज बरडे, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, पवन शिरसाळे, रवींद्र पाटील, रोहित देवरे, तन्मय राणे, अजय चौधरी, विलास राणे, सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलू शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, खुशाल महाजन, संकेत कापसे, संतोष भंगाळे, ललित पाटील व संतोष पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही उपस्थिती केवळ गर्दी नव्हती, तर बूथस्तरावर उभ्या असलेल्या संघटनेची ताकद दर्शवणारी होती.
या संपूर्ण प्रचारात एक बाब प्रकर्षाने जाणवत होती — गायत्री इंद्रजीत राणे यांच्याबाबत नागरिकांमध्ये असलेला विश्वास. “काम करणारी, उपलब्ध राहणारी आणि प्रामाणिक प्रतिनिधी” अशी त्यांची प्रतिमा जनतेच्या मनात खोलवर रुजलेली दिसत होती. अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून पुढे येत त्यांना आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या आणि “हीच आमची नगरसेविका” अशी भावना व्यक्त केली.
आज प्रभाग १२ मध्ये ‘गायत्री राणे’ हे केवळ उमेदवाराचे नाव राहिलेले नाही, तर ते जनतेच्या अपेक्षांचे, विश्वासाचे आणि आशेचे प्रतीक बनले आहे. त्यामुळेच त्यांच्या कामाची, त्यांच्या स्वभावाची आणि त्यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा गल्लीगल्लीत सुरू आहे. एकूणच भाजपचा हा प्रचार केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता संघटित ताकद आणि जनतेच्या विश्वासावर उभा राहिलेला असल्याचे स्पष्ट झाले असून, ही एकजूट विरोधकांसाठी निश्चितच धोक्याची घंटा ठरत आहे.
