प्रभाग १२ मध्ये गायत्री राणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ अंतर्गत येणाऱ्या टेलिफोन नगर, समिंत्र कॉलनी, पार्वती नगर आणि पटेल नगर परिसरात जोरदार प्रचार फेरी पार पडली. या प्रचारात उमेदवार गायत्री इंद्रजीत राणे (१२-क), नितीन मनोहर बरडे (१२-ड) आणि अनिल सुरेश अडकमोल (१२-अ) यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रचार दौऱ्यादरम्यान विशेषतः गायत्री राणे यांच्या कार्यशैलीची, जनसंपर्काची आणि सामाजिक बांधिलकीची नागरिकांकडून मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली. प्रभागातील मूलभूत प्रश्न, विकासकामे, महिला सक्षमीकरण आणि नागरी सुविधा या मुद्द्यांवर गायत्री राणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची नागरिकांनी दखल घेतली असून, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.
या प्रचारात भाजप जिल्हा सरचिटणीस राहुल वाघ, भाजप जळगाव मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष अजित राणे यांच्यासह रणजीत राणे, डॉ. विजय फिरके, जयंत राणे, निरंजन नेमाडे, इंद्रजीत राणे, पंकज पाटील, सुरज चौधरी, नीरज बरडे, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, पवन शिरसाळे, रवींद्र पाटील, दिपेश देशमुख, रोहित देवरे, तन्मय राणे, अजय चौधरी, विलास राणे, सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलु शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, खुशाल महाजन, संकेत कापसे, संतोष भंगाळे, ललित पाटील, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रचारादरम्यान घराघरांत जाऊन संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. ‘विकास, विश्वास आणि पारदर्शकता’ या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाची भूमिका गायत्री राणे यांनी मांडली. महिला उमेदवार म्हणून त्यांनी प्रभागातील महिलांच्या प्रश्नांबाबत घेतलेली स्पष्ट भूमिका आणि आतापर्यंत केलेले काम यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
एकूणच प्रभाग क्रमांक १२ मध्ये झालेला हा प्रचार दौरा केवळ औपचारिकता न राहता जनतेशी थेट संवाद साधणारा ठरला. गायत्री राणे यांच्याभोवती निर्माण होत असलेले संघटन, कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभागातील निवडणूक रंगतदार होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

unlocker.ai – The Ultimate AI Tool for Bypassing Restrictions and Unlocking Content Seamlessly!