संपादकीय : “जळगावकरांनो, तुम्ही फक्त मतदार आहात का? नेतृत्व बाहेरून आणायचं आणि तुम्ही फक्त टाळ्या वाजवायच्या?”
जळगाव शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जे घडत आहे ते लोकशाही नाही… तर राजकीय मालकीहक्काचं उघड प्रदर्शन आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे, धुपाची ऊन सोसून संघटना उभी करणारे, दारोदार फिरून कार्यकर्ते वाढवणारे आणि प्रत्येक निवडणुकीत आपलं शहर स्वाभिमानाने उभं करणारे कार्यकर्ते आज फक्त वापरून फेकण्याच्या वस्तूप्रमाणे वागवलं जात आहेत.
शहरातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि जुने पदाधिकारी, जे वर्षानुवर्षे पक्षाची प्रतिष्ठा जिवापाड जपतात… त्यांना दुर्लक्षित करून आयाराम-गयाराम नावाची टोळी वरून पॅराशूटने खाली टाकण्यात येत आहे आणि त्यांच्यावर शहराचं नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली सुरू आहेत. म्हणजेच मेहनत जळगावकरांची आणि मलाई बाहेरून आलेल्यांची? हा कोणता न्याय?
सत्ता, पद आणि पक्षातील दर्जा पाहून नव्हे तर ओळखीचे फोन येतात म्हणून नेतृत्व देण्याची ही शैली पाहून शहरातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जळगावमध्ये जन्मलेला, वाढलेला आणि पक्षाचा रक्त घाम गाळून विस्तार केलेला कार्यकर्ता नेतृत्वाच्या रांगेच्या बाहेर उभा आणि कधीच शहरात राजकीय पाऊल न ठेवलेला बाहेरचा माणूस थेट सिंहासनावर? हे पाहून शहरातील अनुभवी कार्यकर्त्यांना थेट अपमान झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार एका मंत्र्यांच्या निकटवर्तीयाला जळगावातून उमेदवारी देण्याची तयारी सुरू असून त्यांना शहराची संपूर्ण धुरा सोपवण्याचे आदेश मिळाले आहेत. म्हणजेच जळगावकरांची किंमत फक्त झेंडे फडकवणे, पोस्टर लावणे आणि सोशल मीडियावर जयजयकार करणे एवढीच? नेतृत्व, पद आणि निर्णय मात्र बाहेरून आलेल्यांचं?
शहरात आता एकच चर्चा —
👉 “आम्ही वर्षानुवर्षे राबायचे, आणि नेता मात्र तयार आयात करायचा?”
👉 “जळगावची मतं मिळवण्यासाठी आम्ही, पण सत्ता उपभोगायला बाहेरचे?”
👉 “हा पक्ष आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी?”
राजकारणात बदल हवा, नेतृत्व हवं, प्रशासन हवं पण ते जळगावकरांच्या आवाजावर आधारित हवं. बाह्य दबाव आणि राजकीय फेऱ्यांवर नाही. शहराचा स्वाभिमान कधी विकला गेला आणि नेतृत्व कधी बाहेरून आणण्याची वेळ आली, हा प्रश्न आता तावातावात विचारला जात आहे. याचा अर्थ असा की जळगाव शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि या आगोदर झालेले नगरसेवक शहरातील विकास करण्यासाठी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी अपयशी ठरले आहे का? या मुळे कदाचित तालुक्यातून शहरात स्थाईक झालेल्या लोकांवर महापालिकेत जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार स्पष्ट झाले.

जळगाव कर त्याच लायकीचे आहे… कार्यकर्त तर जामनेर वाले च्या भाषेत बोलायचं तर ५०० रु आणि बोटी वर भेटणार कुत्रा असतो. स्वतःचे गावात कुत्रं मूतत नाही. ते इथे नेते म्हणुन मिरवतात. कारण जळगावकर त्याच लायकीचे.
जळगाव कर त्याच लायकीचे आहे… कार्यकर्त तर जामनेर वाले च्या भाषेत बोलायचं तर ५०० रु आणि बोटी वर भेटणार कुत्रा असतो. स्वतःचे गावात कुत्रं मूतत नाही. ते इथे नेते म्हणुन मिरवतात. २००० विकले जाणारे मतदार असले की असंच होणार
बाहेरचा येणे चुकीचेच पण स्थानिक कार्यकर्ते म्हणजे फक्त पक्ष वाढवण्यासाठी दारोदारी फिरणे, रात्री बेरात्री बोटी खाण्याचे कष्ट करणे आणि करणारे कार्यकर्ते वाढवणारे नसतात.. विकास कामे कुठे आहे जळगांव मध्ये?.. मुख्य आणि गल्ली बोळातील रस्ते आधीच खड्डेयुक्त त्यात खोदून ठेवलेले, त्यावर कच टाकून ठेवलेला, अर्धवट रस्ते, रोड लाईट, त्यात हप्ते घेऊन अतिक्रमणाने अर्धे रस्ते झाकलेले, रस्त्याच्या मधोमध मंडप टाकून कार्यक्रम करणारे कार्यकर्ते, शहरातील बाग बगीचे बाहेरून येणाऱ्या ज्येष्ठ, विद्यार्थी, प्रवासी, अपंग ह्यांसाठी विश्रांती, आराम म्हणून उघडे न ठेवता विकलेले, दादागिरी, गुंडागर्दी.. नळांना पाणी अत्यंत खराब.. बस, रेल्वे, पादचारी सुविधा वाऱ्यावर त्यांच्या प्रमुखांवर कोणतेही नियंत्रण नसणे अशामुळे बाहेरचा येणे चुकीचे च पण इथल्या बेशिस्त कार्यकर्त्यांमुळे हे होणारच..