
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.29814816, 0.4003322);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;
जनता लाईव्ह :– जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा नारा देत महानगरपालिकेने तब्बल लाखो रुपयांचा करार बीव्हीजी या तथाकथित “प्रोफेशनल” कंपनीसोबत केला. पण आज चाळीस दिवस उलटून गेले तरी शहरातील गल्लीबोळ, बाजारपेठा, तसेच हरिविठ्ठल नगरसारख्या भागात कचऱ्याचे साम्राज्य माजलेले आहे. नागरिकांचा श्वास गुदमरतोय – पण बीव्हीजी मात्र शहर “स्वच्छ” असल्याचे कागदावर दाखवण्यात व्यस्त आहे!
महानगरपालिकेचा बीव्हीजीवरील अंधविश्वास हा आता नागरिकांच्या संयमाची थट्टा बनला आहे. ज्या कंपनीने शहर स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले, तीच कंपनी आज नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. दररोज संकलनाचे दाखले, फोटो, अहवाल तयार होतात – पण वास्तवात रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे. हे सर्व पाहता “स्वच्छतेचा ठेका की भ्रष्टाचाराचा खेळ?” असा प्रश्न प्रत्येक जळगावकर विचारू लागला आहे.
हरिविठ्ठल नगरातील बाजारपट्टा असो वा मध्यवर्ती बाजार परिसर – सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छतेने नागरिक त्रस्त झाले आहेत. बीव्हीजी कंपनीचे वाहन आणि कर्मचारी कागदावर फिरतात, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याशी सामना करावा लागतो.
महानगरपालिकेने आता डोळे उघडून या कंपनीच्या निष्क्रीय कारभारावर तातडीने लगाम घालावा. अन्यथा “बीव्हीजीचा स्वच्छता करार” हा शहराच्या अपयशाचा आणि नागरिकांच्या फसवणुकीचा पुरावा ठरेल. जळगाव शहराला वचन नव्हे, कृती हवी — आणि ती तातडीने!
📢 जळगावकरांचा आवाज — कचऱ्यात हरवू देऊ नका!