
जनता लाईव्हव:–पाटबंधारे उपविभाग चाळीसगांव अंर्तगत असलेल्या गिरणा मोठा प्रकल्प आज दिनांक 04/09/2025 सकाळी 6.00 वाजता 95.75 % पाणीसाठा झालेला आहे. गिरणा प्रकल्पाच्या द्वार परिचलन वेळापत्रकानुसार गिरणा प्रकल्पाचा 96 टक्के साठा 15 सप्टेंबर अखेर ठेवणे आवश्यक आहे. मा. कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव यांच्या आदेशान्वये गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता गिरणा प्रकल्पाचे आज रोजी दुपारी 1.00 वाजता द्वार परिचलन करुन गिरणा नदीमध्ये 500 ते 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
सध्यास्थितीत गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून जवळपास एकूण 2500 क्युसेक्स इतका येवा गिरणा धरणात येत आहे. गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल.
त्यामुळे गिरणा नदीकाठावरील नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे की, नदीकाठावरील नागरिकांनी पशुधन, चीज वस्तू, शेती मोटार पंप, गुरेढोरे सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीपात्रात सर्व विभागांची बांधकामे सुरू आहेत सदरील विभागांना देखील सुचित करण्यात येते की आपले चीज वस्तू, बांधकाम साधने, साहित्य योग्य ठिकाणी हलविण्यात यावे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी.
उपविभागीय अभियंता
पाटबंधारे उपविभागचाळीसगाव.