
जळगाव | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभागाध्यक्षपदी रमेश पोपट बाहरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती पक्षाचे राज्यप्रमुख पंडित प्रल्हाद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली. आजवर बाहरे यांनी पक्षासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
उत्तर महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून पक्षाची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बाहरे यांनी सर्वशक्तीनिशी योगदान द्यावे, अशी अपेक्षा या नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी आता बाहरे यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाला नवे बळ मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांत व्यक्त केला जात आहे.