जनता लाईव्ह :-
जळगाव- शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनुज पाटील यांनी व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी घेत, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला.
केळकर मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बळीराम पेठ आणि रेल्वे स्टेशन परिसरातील व्यापार्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडली.
डॉ. अनुज पाटील यांच्या या दौऱ्यात व्यापारी वर्गाने त्यांचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी लाडू आणि पेढे भरून त्यांचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
व्यापार्यांचा असा विश्वास आहे की,
डॉ. पाटील हे जळगावच्या विकासासाठी एक नवा उमेदवार असून प्रामाणिकपणाच्या तत्त्वावर त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली आहे.
डॉ. पाटील यांनी या भेटीत व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. शहरातील व्यापार वाढावा, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळावे, आणि व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या उमेदवारीच्या प्रवासात व्यापारी वर्गाने त्यांना पाठिंबा दिल्याने जळगावच्या राजकारणात एक नवा जोश आणि नवचैतन्य संचारले आहे.
जळगाव शहरातील व्यापारी वर्गाचे प्रतिनिधी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार, डॉ. अनुज पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी व्यापाऱ्यांच्या हितांसाठी काही महत्त्वाच्या मागण्या आणि प्रश्नांची चर्चा केली.
डॉ. अनुज पाटील हे एक सुशिक्षित उमेदवार असून त्यांचे राजकीय जीवन अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे, म्हणूनच त्यांना “कोरी पाटी” असे म्हटले जाते. त्यामुळे शहरात विकास आणि परिवर्तन घडवण्यासाठी ते योग्य उमेदवार असल्याचे व्यापारी वर्गाला वाटत आहे. त्यांनी व्यापारी वर्गाला जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक ते पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविणे हे त्यांचे प्राधान्य असल्याचे त्यांनी या भेटीदरम्यान सांगितले.
याप्रसंगी प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, उपशहर अध्यक्ष सतीश सैंदाणे, ललित शर्मा, सागर पाटील, शरीफ खान, राहुल पाटील, प्रवेझ शाह, इतर आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते

Only some more intensive Our cargo Our enemeys are we had left behind it slowly The