यांत्रिकी कार्यालय चालते ठेकेदारांच्या नियंत्रणाखाली.? माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन रंधे यांचे आरोप !
माझे जीवाचे बरे–वाईट झाल्यास संबंधीत यांत्रिकी विभागाचे अधिकारी यास जबाबदार राहतील.

यांत्रिकी कार्यालय हे ठेकेदारांच्या नियंत्रणाखाली माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन रंधे यांचे आरोप!
नितीन सुरेश रंधे, माहिती अधिकार कार्यकर्ता । सामाजिक कार्यकर्ता नशिराबाद ता.जि. जळगांव
माझ्या संदर्भीय पत्रान्वये अजुनही काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. संबंधित अधिकारी सुद्धा निर्दावलेले आहेत. कारण त्यांचे भ्रष्टाचाराविरूद्ध पत्रव्यवहार होत असूनसुद्धा आपल्या सरकारी गाडी नंबर MH-१५-AB ११९, MH-१५-AA-५२१६ मधुन डिझेल / इंधन न वाहतुक करता ठेकेदारांचे कामगार साईटवर ने-आण करीत असतात. तसेच त्यांचे जेवणाचे डेबे व लिकर घेण्यासाठी MH-१९-AB-११९ ही गाडी ११.४५ वाजता जात असते. तसेच क्षेत्रीय कामावर असलेले पोकलॅन्ड, टिप्पर ड्रायव्हर हे यांचेजवळ ड्रायव्हींग लायसन्स सनतांना सुद्धा चालवत आहेत. गाडी नं. MH-०४-J४-०३४१ तसेच क्षेत्रीय कार्यक्षेत्रावर यांत्रिकी विभागाचा एकही तांत्रिक कर्मचिरी व अधिकारी नसतात. तसेच सरकारी कार्यालयात ठेकेदाराचे कामगार वास्तवा असतात. तरी याची सखोल चौकशी व्हावी.
श्री. किनगे साहेबांना विचारले असता त्यांनी सांगीतले की वरच्या लेव्हलवरून ठेकेदारांना सरकारी गाड्या वापरण्याचे तोंडी आदेश आहेत. यावरून असे वाटते की, यांत्रिकी कार्यालय हे ठेकेदारांच्या नियंत्रणाखाली आहे. जसे ते सांगतील तसे अधिकारीवर्ग कार्य करीत असतात. तसेच ठेकेदार हे सरकारी गाडी त्यांचे कामगाराकरीता वापरत आहेत. याबाबत मीपुरावे लागल्यास देण्यास तयार आहे. तसेच त्यांना पिण्याचे पाणीसुद्धा सरकारी गाडीनेच पोहचविले जात आहे. तसेच वाहनचालक, ऑपरेटर हे शासनाने ठरविलेल्या ड्रेसकोड वापरत नाही, तसेच संबधीत शाख अभियंता यांना कामावरील ठेकेदारांचे किती कर्मचारी कामावर असतात याची काहीही माहिती उपलब्ध नसते. तरी आता चौकशी न झाल्यास कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभागीय पथक जळगांव यांचे कार्यालयासमोर निश्चितच आमरण उपोषण करण्यात येईल याला सर्वस्वी आपण जबाबदार राहणार. कारण आपले, कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभागीय पथक जळगांव यांचे कार्यालयावर कोणत्याही प्रकारचे आपले नियंत्रण नाही असेच मला वाटते.
मी भ्रष्टाचारविरूद्ध आपले कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत असल्यामुळे कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभागीय पथक जळगांव हे स्थानिक रहिवासी असल्यामुळे माझे जीवाचे बरे–वाईट झाल्यास संबंधीत यांत्रिकी विभागाचे अधिकारी यास जबाबदार राहतील.