धरणगाव : पंधराशे रुपयांची लाच घेताना कंत्राटी सेवकास रंगेहाथ अटक
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..

जळगाव : धरणगाव पंचायत समिती मधील मनरेगा मधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहाय्यक यांना १५०० रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगावने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार यांना त्यांचे शेत शिवारात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गोठा शेड तयार करण्याचा कार्यारंभ आदेश देण्याचे मोबदल्यात आरोपी प्रविण दिपक चौधरी, (वय- 39 वर्ष, धंदा-नोकरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, मनरेगा पंचायत समिती धरणगांव, रा. म्हसवे ता पारोळा जि जळगांव. (कंत्राटी सेवक) यांनी तक्रार यांचेकडे 2000 रू लाचेची मागणी केली. तडजोडी 1500 रुपयाची लाच रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दुसरा आरोपी उमेश किशोर पाटील, (वय 36 धंदा-नोकरी, तांत्रिक सहाय्यक, मनरेगा पंचायत समिती धरणगांव, रा. दोंदवाडे, तालुका चोपडा जिल्हा जळगाव. (कंत्राटी सेवक)
या दोघा संशयित आरोपी प्रविण दिपक चौधरी, यांचे सांगणे प्रमाणे गोठा शेड बांधकाम करण्याच्या जागेची आखणी करून जागेचे जीपीएस प्रणालीद्वारे फोटो काढण्यासाठी तक्रारदार यांच्या शेतात जाण्याकरिता व पेट्रोल पाण्याच्या नावाखाली तक्रारदार यांचेकडून पैसे स्विकारण्यास कोणताही विरोध न दर्शवता मुकसंमती दर्शवली. त्यानंतर तक्रारदार यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, बाळू मराठे, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी यांनी ही यशस्वी कारवाई केली.