भ्रष्टाचार

जळगाव मनपा जन्म मृत्यू विभागात नाव,आडनाव किंवा जन्मतारीख तर सोडाच बाप सुद्धा बदलून…

जन्म नावात बदल : महापालिकेत सावळा गोंधळ नाही तर काळाबाजार...

जनता लाईव्ह :–एकाच व्यक्तीच्या दोन जन्म तारखांचे दाखले; मनपातील नोंदी मात्र गायब जन्म-मृत्यू नोंदवही तपासली. त्यात पान क्रमांक २७ वर ९२३१ या अनुक्रमांकाची नोंद १९/०८/९२ या जन्म तारखेबाबतची आहे. त्यानंतर थेट ९३३२ हा अनुक्रमांक नोंदवलेला असून, त्यावर मात्र ५/९/९२ च्या जन्माची नोंद आहे. त्या क्रमांकाला वर्तुळही करण्यात आले आहे. पान क्र. २८ वर ऑगस्ट महिन्यातील एकूण जन्म नोंदीचा तक्ता तयार केला आहे. म्हणजे त्या तक्त्याच्या आधी शेवटची केलेली सप्टेंबर महिन्याची नोंद ही नंतर अनुक्रमांकाची दिशाभूल करण्यासाठी केलेली असावी, असा संशय घ्यायला संधी आहे. पान क्र. २९ वर ९३३३ पासून नोंदी घेण्यात आल्या आहेत. म्हणजे ९२५८ किंवा ९३१० हे अनुक्रमांकचया नोंदवहीत नाहीत. मग त्या नोंदी कुठे गेल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उशिरा जन्म नोंद करण्याच्या आदेशावरील आवक जावक क्रमांक व तहसीदारांच्या स्वाक्षऱ्या संशयास्पद असल्याचे निर्दशनास आले होते. त्यांची पडताळणी अंतिम टप्यात आहे. दाखल झालेल्या ५० आदेशांपैकी ४३ आदेशांवरील आवक जावक क्रमांक व स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत दिसून आली आहे. त्यामुळे त्या ४३ अर्जाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

तसेच सदर दाखले मिळविण्यासाठी संबधित व्यक्तींनी तहसीदारांचे आदेश न आणता एका व्यक्तीनेच ते सर्व आदेश महापालिकेत दखल केले आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा संशय वाढला व त्यांनी वरीष्ठांना ही बाब सांगितली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालय बोगस दाखल्यांचे केंद्र बनले.

मला माहिती नाही..

• मी या विभागात महिनाभरापूर्वीच आले असून या नोंदी कुठे आहेत आणि दोन वेगवेगळ्या तारखा असलेले जन्म दाखले कसे तयार केले हे मला सांगता येणार नाही.- मनीषा उगले, विभागप्रमुख, जन्म-मृत्यू नोंदविभाग मनपा.

जन्म दाखल्यात बाळाचे नाव बदल करता येत नाही. आडनाव किंवा किरकोळ दुरुस्ती करता येते, मात्र त्यासाठी आवश्यक पुरावे जोडावे लागतात. शिवाय त्याची नोंद मूळ रजिस्टरला करणे बंधनकारक आहे. अशा सर्व प्रकारच्या दाखल्यांची पडताळणी केली जाईल. जो कोणी दोषी आढळून येईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल.

ज्ञानेश्वर ढेरे, आयुक्त,

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button