भ्रष्टाचार

जन्म, मृत्यूच्या बोगस नोंदीत बांगलादेश कनेक्शन…

मनपा : जन्म, मृत्यू विभागही परत एकदा आला संशयाच्या भोवऱ्यात...

जनता लाईव्ह:–जळगाव महापालिकेचा जन्म-मृत्यू विभाग सातत्याने काही ना काही कारणांनी चर्चेत राहत आहे. मध्यंतरी कंत्राटी कर्मचारी महिलेच्या जागेवर तिचा पती काम करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

आता ही चक्क 60 दाखल्यांवर तहसीलदार यांच्या बनावट सही शिक्या असल्याच्या संशयाला आहे.तसे आदेश तहसीलदारांना पडताळणीसाठी पाठविले आहेत. या आदेशांची पडताळणी गेल्या तीन दिवसांपासून सुरु असून पुढील दोन दिवसात त्यात बनावट सह्या व बोगस आवक जावक क्रमांक आढळून आल्यास असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

हे सर्व आदेश एकाच व्यक्तीकडून दाखल करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना जन्म दाखल्याची नोंद करावयाची आहे. ते व्यक्ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी आलेले नाही, त्यामुळे सदर आदेश हे बनावट तर नाही ना? मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांना पडला.

इतकेच काय मध्यंतरी सिंधी कॉलनीतील चेतनदास मेहता रुग्णालय बोगस दाखल्यांचे केंद्र बनले होते. तेथून पैसे देऊन दाखले वितरीत करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. ज्या दाखल्यांची पडताळणी केली जात आहे, त्यातील बहुतांश दाखल्यांचे प्रकरणे आदेशांवरील सह्या व आवक जावक क्रमांक बघितले असता ते देखील संशयास्पद आढळून आल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबत कळविले आणि वरिष्ठांनी यासंदर्भात चर्चा करून तहसीलदारांच्या आदेशावरील सह्या व आवक जावक क्रमांक यांची तपासणी करण्यासाठी तहसीलदारांना पत्र पाठवून ५० जणांची यादी पाठवली आहे.मनपाच्या पत्राच्या अनुषंगाने तहसीलदार शीतल राजपूत यांच्या टीमकडून पडताळणीचे काम सुरु आहे. या पडताळणीत आदेशावरील सह्या व आवक जावक क्रमांक बनावट आढळून आल्यास हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.जन्म-मृत्यू विभागातील कर्मचारी किंवा

अधिकाऱ्यात संगनमत असल्याची चर्चा आहे. या दाखल्यांचे बांगलादेश कनेक्शन आहे का? याची देखील खातरजमा केली जात आहे. ज्याचा जन्म व मृत्यू जळगाव शहरात झालेला नाही किंवा येथे यापूर्वी नोंदी नाहीत अशाही दाखल्यांच्या ऑनलाईन नोंदी झाल्याचा संशय असून त्यादृष्टीने सर्व रेकॉर्ड तपासले जाणार आहे.

तरी या संदर्भातील 8 जानेवारी रोजी आमच्या प्रसार माध्यमाद्वारे चक्क कंत्राटी महिलेच्या जागेवरती पती काम करताना आढळून आलं असताना मुख्य अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांनी त्यांना गठ्ठे उचलायला परवानगी दिलेली आहे असे सांगत ह्या प्रकरणात टाळाटाळ करण्यात आली होती या प्रकरणात आम्ही सतत पाठपुराव्य चौकशी समिती नेमण्यात आलेली होती परंतु या समितीचा अहवाल अद्यापही वारंवार मागितल्यावर सुद्धा दिलेला नाही यावरून असे वाटते की यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही हात असू शकतो या प्रकरणात वेळीच कंत्राटी कर्मचारी व डॉक्टर विजय घोलप यांची वेळीच दखल घेऊन कारवाई केली असती तर कदाचित हा प्रकार कुठेतरी थांबला असता का.? निर्माण होतो.

का करण्यात आली नाही वेळीच चौकशी,

का अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यात आले,

व्हिडिओ चित्रण मध्ये स्पष्टपणे दोषी कोण हे आढळत असताना सुद्धा अधिकारी अशा कृत्या का पाठीशी घालत आहेत,

चौकशी अहवाल सादर करण्यासाठी का लागले तीन महिने असे अनेक प्रश्न हे जनसामान्यांच मनात निर्माण होत आहेत खरंच या सर्व बाबींना जबाबदार कोण.?

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button