गांधी विचार संस्कार परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जनता लाईव्ह:–विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर शाळेत गांधी विचार संस्कार परीक्षेत तीन विद्यार्थ्यानी जिल्हा पातळीवर तृतीय क्रमांकाने घवघवीत यश संपादन केले त्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज आधार पाटील,प्रशासन अधिकारी श्री दिनेश ठाकरे , समन्वयीका सौ वैशाली किशोर पाटील यांच्या हस्ते व मेडल प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. त्यात जान्हवी पुरुषोत्तम घाटोळ, सात्विक योगेश भोंबे ,समर्थ मनोज सूर्यवंशी यांना कास्य मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेसाठी
गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव यांचेकडून ट्रॉफी देण्यात आली त्याचा स्वीकार मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील यांनी केला.
गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव अंतर्गत गांधी विचार संस्कार परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर घेतली जाते.या वर्षी या परीक्षेत इयत्ता ५ वी ते १०वी या वर्गातील एकूण 58 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गांधीजींचे विचार व गांधींविषयी आवड निर्माण व्हावी यासाठीही परीक्षा घेतली जाते.या परीक्षेचे समन्वयक म्हणून श्री सचिन गायकवाड यांनी परीक्षेचे नियोजन केले. तसेच सौ वैशाली पाटील, सौ दिपाली कापडणे, सौ मयुरी सुलक्षणे,सौ रुपाली पाटील ,सागर वारंगे ,श्री श्रीराम लोखंडे,सौ हेमांगीनी चौधरी, श्री आकाश शिंगाणे, सुजाता पाटील ,सौ शुभांगी येवले, श्री सचिन गायकवाड या शिक्षकांचा सत्कार गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेचग गांधी रिसर्च फाउंडेशन मार्फत श्री गिरीष कुळकर्णी, श्री चंद्रशेखर पाटील,श्री विश्वजीत पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.