आदिवासी विकास मंत्री मा.अशोक उईके साहेब व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले पत्र..
सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड यांनी आज मंत्रालय मुंबई येथे

जनता लाईव्ह:–जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव व मागासवर्गीय बांधव हे शासनामार्फत घरकुलासाठी वाटप होत असलेल्या शबरी घरकुल योजना व रमाई घरकुल योजना या योजनांचे लाभापासून अनेक वर्षापासून वंचित राहत असल्याने याबाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ योग्य ते सहकार्य होऊन या योजनेचा गरीब जनतेला लाभ मिळवून देण्यात यावा अन्यथा आम्ही सर्व गरजु घरकुल समाज बांधव उपोषणाचा मार्ग अवलंबविणार असलेबाबत…
या संदर्भात वेळोवेळी प्रकल्प अधिकारी, यावल, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सोो. जि.प. जळगाव, मा. जिल्हाधिकारी सो., जळगाव, मा. गटविकास अधिकारी सोो.पं.स. जळगाव व याबाबत संबंधित असलेला विभाग यांचे केलेला पत्रव्यवहार..
आदिवासी व इतर मागासवर्गीय समाजातील गरजु व हातमजुरी करणारे जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. आम्ही आमचा संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मोलमजूरी करुन करीत असतो.
आम्हांस सुरुवातीला शासनाकडून घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात येत होते.त्यानंतर आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेब, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब तसेच प्रकल्प अधिकारी, यावल व यासंबंधी असणारे सर्व अधिकारी यांची वारंवार भेट घेऊन त्यांना लेखी निवेदने सादर करुन त्यांचेकडून जागा उपलब्ध करुन घेतलेली आहे.
आता आमच्या नावे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध असतांना देखील आम्ही आपनाकडून घरकुल बांधकाम करणेसाठी मिळणाऱ्या निधी पासून वंचित रहात आहोत याबाबत प्रकल्प अधिकारी यावल तसेच जिल्ह्यातील घरकूल योजने संबंधातील अधकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भात त्यांना विचारपुस केली असता त्यांचेकडून आम्हांस उत्तरे मिळतात की, सद्यस्थितीत शासनाकडून घरकुल संबंधित उद्दीष्टे प्राप्त झालेले नाही. ते आल्यावर तुम्हांस लवकरच निधी उपलब्ध करुन दिला जाईल, तसेच हे काम शासन स्तरावरुन असून याबाबत आपण संबंधित मंत्री महोदय यांची भेट घेतल्यास तुमचा प्रश्न लवकर मार्गी लागेल असे सुध्दा सांगितले जात आहे.
त्यामुळे आम्ही संबंधित कार्यालयांच्या चकरा मारुन आता थकलेलो आहोत. तरी आता शेवटी आम्हांस आपणांकडून न्याय मिळेल या आशेने आपणांकडेस आमची समस्या मांडीत आहोत. जेणेकरुन आपणांकडून आमच्या जळगाव जिल्ह्यास शबरी घरकुल योजना व रमाई घरकुल योजना या घरकुल संबंधिचे उद्दिष्ट (टारगेट) लवकरात लवकर मंजूर होऊन मिळाल्यास आमच्यासारख्या गरजू व गरीब कुटुंबांना घरकुलाचा लाभ होईल व आम्हांस आमचे हक्काचे पक्के घरकुल मिळेल व आमचे घरकुल अभावी होत असलेले हाल कायमचे आपल्या मदतीमुळे थांबेल अशी आम्हांस आशा आहे.
तरी महोदय साहेब आपणास जळगाव जिल्ह्यातील सर्व गरीब व गरजु आदिवासी भिल्ल व मागासवर्गीय कुटुंबे विनंती करीत आहोत की, आम्हां सर्वांना लवकरात लवकर घरकुल बांधकामासाठी चा निधी आपल्या स्तरावरुन मिळवून द्यावा.
याबाबत आमच्या प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास नाईलाजास्तव आम्ही जळगाव जिल्ह्यातील सर्व आदिवासी व मागासवर्गीय कुटुंबे घरकुलाचा लाभ मिळणेसाठी लोकशाही मागनि मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाचा मार्ग अवलंबू याची कृपया दखल घ्यावी ही नम्र विनंती आहे